CFG Name
रजी. नं : एफ - १९२५०

विकासाच्या दृष्टिकोनातून वंचित लोकांच्या जीवनात शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी उत्प्रेरक म्हणून क्रेझी फ्रेंड्स ग्रुप ही संस्था मागील दशकापासून अविरत कार्य करीत आहे. मूलभूत आणि दर्जेदार शिक्षण, चांगले वातावरण आणि आरोग्य देणारा एक चांगला समाज निर्माण करण्याच्या दिशेने काम करणे हे संस्थेचे ध्येय आहे.

UPCOMING ACTIVITIES

रंग दे बसंती २०२५ ( तपपूर्ती सोहळा )

Event Image

नमस्कार मित्रांनो, गेल्या १२ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये “रंग दे बसंती” या उपक्रमाच्या माध्यमातून आपण अनाथ, अपंग, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचं व्यासपीठ देत आहोत.

यंदाही आम्ही तोच संवेदनशील आणि सशक्त ठसा घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालो आहोत! हा तपपूर्ती सोहळा केवळ कार्यक्रम नाही, तर समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचं सामूहिक उत्तरदायित्व आहे.

चला, काहीतरी चांगलं करूयात! फक्त कलाकार नाही, माणूस घडवूया !

📍 Venue: Triiloksing Jabinda Lawns, Opp. Bembde Hospital, Behind Shriraj TVS, Beed Bypass, Chh. Sambhajinagar

🗓️ Date: Friday, Aug 15, 2025

⏰ Time: 04:30 PM

Every Picture Tells a Story